कविता - अभंग 🌷 " सप्रमाण सिद्ध "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
विधात्यानं केला मनुष्य निर्माण ...
रोपूनी कुडीत जीव व पंच-प्राण ...
त्याचे सदैव राहते देही नियंत्रण ...
पंच-महाभूतांचे योग्यसे मिश्रण ...
जोवर असेल देहात आत्माराम,
तोवरच राहतो, कुडीमध्ये प्राण ...
जेव्हा जाई तो जड-देह सोडूनी,
पुन्हा न येई तो, कुडीत फिरूनी ...
आत्माच असे तो, मनुजाचे प्राण ...
अंतरी-आत्माराम वसे सपंचप्राण ...
मृत्युपश्चात् अवयवांचे होते-रोपण,
सिद्ध करीतसे, हे कथन सप्रमाण ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply