कविता -अभंग 🌷 " परि एक नियंता "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १६ नोव्हेंबर २०१६
मनुष्य देह, जन्मजात अति-सुंदर ...
मनुष्य मनं, जन्मत:च अति-प्रखर ...
मनुष्य रूप, देवदत्त अति मोहक ...
अघोरी मानवी-कृत्य अति दाहक ...
मानवी देहाचा अणु-रेणू प्रत्येक ...
स्वतंत्र शक्तिचे स्वरुप आहे एक !
विविध अवयव, परि एक नियंता ...
आतून सदा मार्गदर्शन करी त्राता ...
दरेक अवयवाचे नियोजित कार्य,
त्यानेच चोख बजावणे, अनिवार्य ...
नियंता, नियोजनपूर्वक ठरवी सर्व
शरीरात समतोल राखण्याने स्थैर्य ...
जेव्हा भासते अखिल विश्वं आपले ...
स्थिरं-समतोल होई, अंतरंग सगळे ...
भाळी सूर्य-चंद्र एक झाले हे कळते ...
आप-पर-भाव मिटून-श्री दर्शन लाभते ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply