कविता -अभंग 🌷 " नखशिखांत मन:शान्ति "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, ३० मार्च २०२४
अंधाराचे कु-साम्राज्य आता संपले ...
आता खरे जीवित-कार्य सुरू झाले ...
विनाकारण कायम भरकटणे सुटले,
तेजाळलेल्या दशदिशांनी धन्य केले ...
जन्म कशापायी, हे समजून चुकले ...
स्व-कार्याच्या मर्यादा-आकलन झाले ...
योजना-बद्धरित्या तसे वागणे झाले ...
उकलले ज्ञान, अज्ञान सारेच संपले ...
अखेर, संपतेच आयुष्याची भटकंती ...
भरकटणे व्यर्थ जरी झाले, सुरुवाती ...
यापुढे जीव न झुरवणे, कधीच खन्ती ...
अंतर्-बाह्य नखशिखांत ही मन:शान्ति ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
Leave a Reply