कविता -अभंग 🌷 ” त्रिकाल-ज्ञानाची ध्वजा “

कविता -अभंग 🌷 " त्रिकाल-ज्ञानाची ध्वजा "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १६ नोव्हेंबर २०१६
वेळ - रात्री, ११ वाजून ३३ मि.

नेटाने प्रयत्न करता, ईप्सित होई साध्य
निश्चित कृती करता, काही नसे असाध्य

आत्म-ज्ञान-प्राप्तीची हीच विशेष महती ...
अंतरीची अनुभूतीच देई चिरकाल-शांती ...

सदैव जसा असे राजा तशीच असे प्रजा ...
मनात विचार जर ठाम, मग न वाटे सजा ...

उगाच फुकाचा न करावा जनी गाजावाजा ...
आत्माराम तृप्त होता तत्पर तो कामकाजा ...

मस्तकी उगम पावता, रवी-चंद्राची आभा ...
नभी उंच फडकते त्रिकाल-ज्ञानाची ध्वजा ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!