कविता – अंतरी-दोन-राम, एक-द्वंद्व

कविता - अंतरी-दोन-राम, एक-द्वंद्व

कविता - अंतरी-दोन-राम, एक-द्वंद्व
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

|| विष्णोर्धं महाभागं पुत्रमैक्ष्वाकुनंदनम् |
लोहिताक्षं महाबाहुं रक्तौष्ठं दुंदुभिस्वनम् ||

सदान्-कदा मानवी-मन, द्विधा-मनस्थितीत असतं
एक मन जे जे सांगतं, त्या-विरुद्धच-दुसरं-बजावतं...

कारण अंतरी-स्थित-असे, एक नव्हे दोन-दोन-राम
एक निज-आत्माराम आणि दूजा, स्थित-राजाराम...

सत्-चित्त-राम, सतत सन्मार्ग-दर्शन करीत असतो
आत्माराम, दिशाभूल-करण्याच्या-प्रयत्नात असतो...

नुसत्या उलट-वा-सुलट-रित्या जरी रामनाम जपलं,
तरीसुद्धा नेमकं पापांच्या-राशींचं-सहज-दहन करतं...

इतकं सामर्थ्य, केवळ श्रीरामनाम-जप-यज्ञात आहे
तितकीच प्रचंड फलश्रुती, रामरक्षा-स्तोत्रातही आहे...

श्रीराम हा विष्णूचा, सातवा मनुष्य-रुपातील-अवतार
दोन-रामातील-द्वंद्व, त्याच्याही-अंतर्मनी-झालं-असणार...

जन-मानसाचे ऐकावे किंवा सत्-चित्त-रामाचे ऐकावे,
गर्भवती-सीता-त्यागाबद्दल मनात द्वंद्व झालेच असावे...

डाग-असावा अशी-मान्यता आहे सुंदर-शितल-चंद्राला,
म्हणून-संबोधले"विष्णोर्धं,"आदर्श-पुत्र-राजा-रामचंद्राला...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!