
कविता - अंकुर
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
वर्षा-धारा कोसळल्या,
अधीर धरणी विसावली...
दशदिशा सुगंधित झाल्या,
धरणीची कूस उजवली... ||१||
सगळीकडे धामधूम झाली,
अन् बघता बघता हळूच...
इवल्या-इवल्या अंकुरांना,
जाग आली, जाग आली... ||२||
लाल-काळ्या माती मधूनी,
नाजूक हिरवीगार पालवी...
हलकेच झूळूक वा-याची,
जणूकाही त्यांना जोजवी... ||३||
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply