कविता:🌷 ” हे मोठ्ठं होणं द्वाड गं “


कविता:🌷 " हे मोठ्ठं होणं द्वाड गं "
कशित्री: तिलोत्तमा विजय लेले

आजही वाटतं मन-सोक्त हुंदडावं,
रानोमाळ भटकंतीत खूप बागडावं...
आता मात्र काहीच कळेनासं झालं,
करणार काय, हे मोठ्ठं होणं द्वाड गं...

चिंचा, बोरं-करवंद शोधत फिरावं,
झाडांच्या झोक्यावर मस्त झुलावं...
आता मात्र डोकं उगीचच गरगरतं,
करणार काय, हे मोठ्ठं होणं द्वाड गं...

निळ्याशार आभाळी भानच हरपावं,
एकटक बघत-बघत स्वत:स शोधावं...
आता मात्र वेडं मन सुन्न होऊन गेलं,
करणार काय, हे मोठ्ठं होणंही द्वाड गं...

समुद्र-लाटांना अंगावर झेलत राहावं...
अथांग सागरी, यथेच्छ-डुंबत पहुडावं...
आता मात्र तन-मन ओलं चिंब झालं,
करणार काय,  हे मोठ्ठं होणंही द्वाड गं...

मऊ मखमली रेती, शंख शिंपले ज्यात...
शोधता-शोधता सारेच हरखून जातात...
हातातून निसटणा-या क्षणांना जगावं...
कारण काय तर हे मोठ्ठं होणंच द्वाड गं...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!