कविता : 🌷 " इच्छा-पूर्ती " कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारकासुरानें तिन्ही लोकी हैदोस घातलेला ब्रह्मदेवांच्या वरामुळं पुरताच होता मातला… अत्याचारांनी प्रजा त्राही-त्राही झाली होती त्या मारण्यास,जन्मला शिवपुत्र-स्कंद अंती…
देव-दानव संग्रामात, स्कंद-बाळच सेनापती स्कंदमाता-रूपात स्कंदासह दुर्गा सहभागी… स्कंदबाळ मांडीवर, सिंहावर आरूढ झाली चार भुजा, त्रिनेत्र-सोन्यापरी तेजस्वी कांती...
दोन-कमल-पुष्पं स्कंदमातेच्या दोन्ही हाती डावा-वरद-हस्त व स्कंदबाळ-उजव्या-हाती... पद्मासनात विराजमान म्हणूनी "पद्मासना" शुभ्र रंग तिज प्रिय-सूर्यापरि दिव्य तेजांगना...
देवी-स्कंदमाता, हिमालयाची-पुत्री ओजस्वी मातेसह स्कंदबाळ ही रणात लढले सर्वस्वी देवांचा शूर सेनापती- कार्तिकेय तो मनस्वी… दिव्य-शौर्य पाहून स्तंभित झाले सर्व तपस्वी...
मुरुगन-स्कंदाने लीलया वध केला तारकाचा... स्कंद-मातेने आणि षणमुखाने, दानव-सेनेचा नाश केला, अन्यायाचा, दुष्ट-पापी-दानवांचा... सर्व देवतांनी जयकार केला विजयी स्कंदाचा
देवीच्या उपासनेमुळे दिव्य आभा झळाळते भक्तांचे, असामान्य व्यक्तीमत्व बनत जाते... कर्तृत्व, धडाडी, ओजस, यशश्री प्राप्त होते उपसकांच्या सर्वच इच्छांची, पूर्ण-पूर्ती होते...
Leave a Reply