कविता 🌷 " हृदयाच्या कोंदणी "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
सरली जरी गं दिपावली,
तशीच राहिली, रांगोळी...
दारो-दारीच्या अंगणी गं,
तुळशीपाशी स्थिरावली...
दिवा, पणत्यांची गं आरास...
रोशणाईचा भपका खास...
रंगीबेरंगी आकाश कंदील,
घरच्या शोभेत भर घालील...
चकली-चिवडा-शंकरपाळी,
रोज खाऊन कंटाळली सारी
गरमा-गरम वडा अन् इडली,
ताव मारण्या उत्सुक मंडळी...
तुळशी-विवाहापर्यंत सारे...
रोजच्या रोज सणाचे वारे...
हौस-मौज-धमाल सगळी...
अनार-पाऊस नभ उजळी...
दिवाळी येई एकदाच जरी...
आनंदाची लयलूट वर्षभरी...
फटाके-कपडे-दाग-दागिने...
हर्षोल्लासे उजळली जीवने...
पाडवा-भाऊबीज ओवाळणी...
पति-पत्नी अन् भाऊ-बहिणी...
मना-मनामध्ये सुखाची पेरणी...
जतन करू, हृदयाच्या कोंदणी...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply