कविता:🌷”पहिली-माळ-शैलपुत्रीची”


कविता : 🌷 " पहिली-माळ-शैलपुत्रीची "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

घट-स्थापनेनंतर नवं-दुर्गेची पहिली माळ ...

आज अचानक डावा डोळा उडे ...
विचार मनी येई कोण येणार गडे ...
तेवढ्यात दारावर हलके थाप पडे ...
दार उघडता, नजरेस कुणी न पडे ...

झुळूक, सुगंधी-सुवासिक धूपासह आली
त्यामुळे तन्मने प्रसन्न-ताजीतवानी झाली
पाठोपाठ वहीनी, सुहास्य-वदनाने आली
तिच्या रूपाने जणू "शैल-पुत्री"घरा आली

नेसुनी जरीची साडी-चोळी ...
लाल-कुंकुम ल्याली भाळी ...
आज भासे मज ती निराळी ...
शैलपुत्रीसम दिसे ती भोळी ...

हिमालयाची सुपुत्री ...
म्हणून नाव शैलपुत्री ...

होता दक्षाकडून अपमानित,
त्वरित उडी मारली, यज्ञात ...
अन् केला तिने प्राण-त्याग ...

दुसऱ्या जन्मी होई पार्वती ...
वरण्यास श्रीशंभो-पशुपती ...
तपस्या करी ती दिन-राती ...

अंती शिवशंकर प्रसन्न होती ...
"वत्से वर माग "असे वदती ...
विवाहाची इच्छा दर्शवी, ती ...

शिव-पार्वती विवाह-सोहळा होई संपन्न
अवघी सृष्टी-देवता,होई धन्य-धन्य-धन्य

तिन्ही लोकी अपार आनंदाला येई उधाण
पुष्पवृष्टी करी देव-दानव-मानव समसमान
ब्रह्मा आणि विष्णू या सोहळ्याचे यजमान ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!