कविता :🌷" पवित्र बंध-अपरंपार "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
रक्षाबंधन अन् माहेर हे जणू अद्भुत-जादूमयी-रसायन
श्रावणी-पौर्णिमेला यथासांग साजरा करतात हा सण
जरी स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर असली तरी,
जपते माहेरचे ऋणानुबंध अन् दोन्ही घरची नाती-गोती
हृदयस्थ असतं एक खास स्थान-माहेराचं त्याच्या परीनं
माहेरच्या ओढीनं त्याचं महत्त्व वाढत जातं, कैक पटीनं
भाऊ म्हणजे बालपणा-पासूनचा सुख-दु:खांचा सोबती
त्यामुळे हे अतूट-नातं-मायेचं-जवळचं-अन्-आनंद-दायी
बहिण-भाऊ हे एकमेव असं नातं, जे निखळ प्रेरणादायी
गुण-दोषांसकट एकमेका स्वीकारुन हे चिरंतन सुखदायी
भाऊ लहान असो वा मोठा, कायम देतो भक्कम आधार
राखी बांधल्याने याच कोमल भावना होती प्रत्यक्ष साकार
सिकंदरच्या पत्नीने, हिंदू-सम्राट-पुरूला राखी-बंधू मानला,
अलेक्झांडरला जीवदान देत, जणू पुरूने बंधू-धर्म पाळला
बळीराजास रक्षा-सूत्र बांधून, लक्ष्मीने त्यास भाऊ बनविला
तिच्या सन्मानार्थ बळीने स्वर्ग-लोकी जाऊ दिले श्रीविष्णुला
रक्षासूत्र बांधण्याचा तो पावन दिन होता श्रावणी-पौर्णिमेचा,
आजवर रक्षाबंधन-सण-साजरा, हेतू स्मृती जतन करण्याचा
वेद-पुराणकाळापासून चालत आल्या आहेत प्रथा पूर्वापार,
मन:पूर्वक पालन केल्याने दृढ होतील पवित्र-बंध-अपरंपार
निसर्ग-रक्षणाचे-चिन्ह, अग्रमान-व-राखी-तुळस-कडुलिंबाला
पंच-पक्वान्ने-पूजारती-हाती, आतुर बहिणा औक्षण करायला
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply