कविता : 🌷” तोचि भार वाहे “ कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
जन्म-भोग-व-मृत्यू विधी-लिखित-जीवनाचे, स्वामी तिन्ही जगाचा, एक तोचि भार वाहे...|| ध्रु ||
जीवन-पटावरील, सारेच सोंगट्या आपण... प्रत्येकाची चाल न्यारी, न त्यात मी-तू-पण भाग्यात जे जे लिहिले, भोग ज्याचे- त्याचे... या-ना-त्या-रूपे प्राप्त-भोगणे, पाप-दरेकाचे...|| १ ||
दुर्भाग्यवशे वनात धाडली, गर्भवती सीता... वाल्मिकी-आश्रम जणू आधार, माहेराचा... पूर्ण चराचराच्या-स्वरुपात स्वतः सृष्टीकर्ता, कोणी नाही ज्यांना त्यांसाठी, असे विधाता...|| २ ||
दुर्दैववशात पांचाली दरबारात आणली गेली... करुनी-नामस्मरण-धावा, ती सुरक्षित राहीली... वस्त्र-फेडणा-या-दोन-हातांहून अनंत-हस्तांनी, द्रौपदीला सांभाळले, लज्जित होण्या-पासूनी...|| ४ ||
ठेवूच नये अपेक्षा या जगती कोणाकडूनही, स्वार्थांध, उन्मत्त सगळेच आपापल्या परीनी... परि एकच तो नियंता, डोळ्यात तेल घालूनी, वेळे-आधी ठामपणे उभा, थेट जन्मा-पासूनी...|| ५ || वेळे-आधी ठामपणे उभा, थेट जन्मा-पासूनी...🙏
Leave a Reply