उभं आयुष्य श्रीकृष्णाने अन्याय समूळ नष्ट केला... तान्हा असतां राक्षसी-वृत्तीच्या-पुतनेचा वध केला बालवयातच कालियाचा, मातलेल्या कंस-मामाचा... किशोरवयात, शंखासुर नावाच्या उन्मत्त दानवाचा...
गृहस्थाश्रमात पत्नी-सह, नरकासुराचा वध केला हजारो पीडित महिलांना, सन्मान मिळवून दिला... दयनीय अवस्थेतील द्रौपदीचा आधारस्तंभ झाला बेफाम कौरवांना पराभूत करून अन्याय संपवला...
समाजातील अघोरी, दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट केला "यदा-यदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति"हा प्रत्यय दिला... आदर्श जीवन कसे जगावे, सखोल, उपदेश दिला हा मानवी जन्म कसा सार्थकी लावायचा, कथिला...
'श्रीमत्भगवद्गीता' या ग्रंथाचा उपहार बहाल केला "न भूतो न भविष्यती" एकमेव, अद्वितीय विद्वत्ता... कालातीत अत्युच्च कोटीच्या ज्ञानाचा हा खजिना अनादि-अनंत कालापासूनचा हा मार्गदर्शक नमुना
आजही गरज आहे, श्रीकृष्ण-सत्यभामा होऊन ... समाजातील छुप्या, अत्याचारी-राक्षसांना शोधून ... अत्यंत-जरुरीचं-आहे छुप्या-नरकासुरांना-मारणं ... आवश्यक आहे, त्यांचा समूळपणे निप्पात करणं ...
दानव-दैत्य जसे बाह्य-जगातले, तसे मनातलेही... जागृक होऊन त्या सर्वांना नष्ट करण्या जमेलही... कारण "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता गळे तेलही"... ठामपणे निर्धारू, तर लीलया उचलू मेरु-पर्वतही...
Leave a Reply