कविता : 🌷 " इच्छित फल-प्राप्ती " कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
थोर ऋषी " कात्य " यांनी घोर तप केले … दुर्गा-मातेला " पुत्री-रुपात " मागुन घेतले … वरदान म्हणूनी जन्म घेतला प्रसन्न देवीने, कात्याऋषींची लेक"कात्यायनी"नाव दिले
आजच्या नवरात्रीच्या सहाव्या शुभदिनी, पूजन-अर्चनाची उत्सव-मूर्ती कात्यायनी ... शांत-रूप, चार भुजा, त्रिनेत्रा, वरदायिनी ... कांती सोनपरी, शोभिवंत सुंदरी त्रिभुवनी ...
महिषासुर राक्षसाचे अतोनात अत्याचार ... तिन्ही लोकी माजलेला नुस्ता हां-हांकार ... विजयादशमीचा अतिशय शुभ होता वार ... देवीने क्रूर-मुजोर दैत्यास जीवे मारले ठार ...
माजलेल्या दुष्ट, अतिक्रूर माहिषासुरास … तिने उग्र रूप घेतले, धडा शिकविण्यास ... देवीने, यमसदनी पाठविले त्या असुरास, होऊन सिंहावर स्वार,नष्ट केले राक्षसास …
ही देवी मनो-सामर्थ्य, मनो-धैर्य वाढवते… त्यामुळे "मन-शक्ति"असेही नाव पडले ... रुक्मिणीने कात्यायनी-देवीलाच पुजले, कृपा-प्रसादाने तिला, श्रीकृष्ण मिळाले ...
मनोभावे जो कात्यायनी-मातेला पूजेल ... त्यास धर्म-अर्थ-काम-मोक्ष सर्व लाभेल ... कात्यायनी सत्यधर्म-न्याय-निष्ठा पाळते ... भक्तांच्या वांच्छित मनोरथांची पूर्ती होते ...
रोग-शोक-संताप-सूड-भयापासून मुक्ति ... भूलोकी अदभूत सुदैवाची होऊन प्राप्ती, लाभती सगळी सुखे, नाम-कीर्ती-श्रीमंती ... नित्य साधना केल्याने इच्छित फल-प्राप्ती ...
Leave a Reply