कविता:🌷”आसुसलेला काळ”


कविता : 🌷 " आसुसलेला काळ "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

बकुळीच्या फुलां-समान, आयुष्य
होतं खूप सरळ-सोपं साधं-सुधंसं...

लहान-सहान गोष्टीत मस्त रमायचं
भातुकली खेळताना सुख मानायचं...

ना कसली असूया ना कधी हेवेदावे
हसून-खेळून, मस्तपैकी झोके घ्यावे...

गंमतीत कोकीळेची नक्कल करताना
तासंतास गात-गात रानोमाळ फिरावे...

पावसात चिंब भिजून जलपरी व्हावे...
अन् थंडगार आईस्क्रीम फस्त करावे...

खेळ-खेळून, फिर-फिर-फिरुन-धावून,
घरी हळूचकन् आईच्या कुशीत शिरावे...

मग सगळ्या गोष्टींचा पार विसर पडून
मायेची ऊब पांघरून गाढ झोपून जावे...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!