कविता:🌷”आठवणींच्या जगात”


कविता :🌷 " आठवणींच्या जगात "     
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

लहानपण आठवलं की, तिला आठवते तिची शाळा 
बालपणीचा एक अविभाज्यं घटक, म्हणजेच शाळा
आता समजतंय शाळेमुळे लागला शिक्षणाचा लळा

सर्वच शिक्षक होते चांगले पण हे कवन सरडे-सरांचे
ते तिच्या भावाचे-सुरेश-अण्णाचे मित्र होते मिरजेचे
त्यामुळे तिच्या-अभ्यासात अंमळ जास्त लक्ष द्यायचे 

शालेय जीवनात तिचा आदर्श होता सर्व शिक्षक-वर्ग 
त्यांचं उत्तम शैक्षणिक-मार्गदर्शन तिला लाभलं सदैव
मिळते सुदैवाने सुसंस्कार-शिक्षणाची, ही दुर्लभ ठेव

वास्तविक त्याकाळचे, शिक्षकांचे तुटपुंजे वेतन होते
त्यात ती खाजगी शाळा, सरकारी-अनुदानही नव्हते
त्यामुळे शिकविण्याची खरोखरची-तळमळ असलेले,

शिक्षण-क्षेत्र निवडून, विद्यादानाची आव्हानं पेलायचे
नव-पिढी-घडविण्याचं,उच्च ध्येय उराशी बाळगायचे,
अक्षरश: शंभर-टक्के देऊन-जीव ओतून शिकवायचे

चौथी-सातवीतल्या विद्यार्थ्यांना-शाळाच निवडायची 
स्कॉलरशिप-अभ्यासक्रमाचं-प्रशिक्षण त्यांना द्यायची  
परीक्षा-केंद्रात नेऊन-परीक्षा-उपरान्त परत आणायची
सगळीच जबाबदारी शिक्षकांची, ही घटनाही तेव्हाची

शाळा सदा गरीब पण शिक्षकांचं हृदय विशाल-सागर
तुटपुंज्या पगाराचे पैसे आनंदाने खर्चायचे विद्यार्थ्यांवर
माहीत असूनही शाळेकडून परत मिळणार नाहीत पैसे,
असं असूनही परीक्षार्थींना नेण्यास, ते आतुर असायचे
 
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!