कविता : 🌷 " स्मृतिगंध "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
मनाला रोज नव-नवी कोवळी पालवी फुटल्यावर,
ते उमलायला-बहरायला लागणार कितीसा उशीर ?
बालपणात एखादा रंगीत खडू किंवा पेन्सिलही
मनाचं भिरभिरं करुन टाकायला पुरेशी व्हायची
बघता बघता झाडून सगळ्या भिंतींवर चढाओढीने
फक्त पतंग अन् फुलपाखरं भिरभिरताना दिसायची
किशोरवयात तर एखादं गुलाबाचं सुंदरसं फूलही
बघता-क्षणी मनावर गालांवर लालीमा उमटायची
नवतारुण्यात सारंच जणू स्वप्नवत् मोहक वाटायचं
अल्लडपणाच्या अनामिक ओढीतच सरायचे दिवस
त्या मंतरलेल्या काळातील क्षण-न्-क्षण बंद कुपीत
हृदयाच्या सात-कप्प्यात स्मृतिगंध बनून ते सुरक्षित
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply