कविता : 🌷 ” विश्व-निर्माती “


कविता : 🌷 " विश्व-निर्माती "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

ऐं ह्रीं क्लीं कूष्मांडायै नमः
सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च।
दधाना हस्तपद्माभ्यां कुष्माण्डा शुभदास्तु मे॥

दुर्गा-देवी जेव्हा संपूर्णतः झाली तेजांकीत,
तिच्या सुहास्य-वदनाने, विश्वं झाले निर्मित
त्याआधी पूर्ण-जग बुडलेलं, घोर अंधारात
कुष्मांडा-विश्वनिर्माती-आदिशक्ति म्हणतात

आदिशक्तिच्या अद्वितीय प्रखर तेजामुळं,
दुष्टांचा अंत, नष्ट होती, पापांची पाळंमुळं
कष्ट-बाधांचा अंत, दु:ख-क्लेश-नष्ट समूळं
भक्तांचे रक्षण, संकटे दूर पळतील सकंळं

देवीची सुवर्ण-कांती तेजानं झळाळणारी
सु-हास्यातून बिजली-समान तळपणारी
देवीची आभा, सूर्यापरी प्रकाश फेकणारी
अंडाकृती ब्रह्मांडाची स्वनिर्मिती करणारी

म्हणून तिचे नाव पडले, " कुष्मांडा देवी "
आठापैकी पाच, अस्त्र-शस्त्र घेऊन हाती
अष्टौसिद्धी-दाती जपमाळ असे एक हाती,
कमंडलू व कमलपुष्प धरिले एकेका हाती

भक्तिपूर्ण-भावाने देवीची केली पूजा-आरती,
लाभे दिर्घायु, प्रकृती-स्वास्थ्य, नाम, कीर्ती
ज्ञानोदय, शक्ति-सद्-बुद्धि-अज्ञानाची क्षिति
म्हणून योगी, "कुष्मांडा-स्वरूपास" पूजती

देवीच्या कृपेने मनातील मळभ नाहीसे होते
अंतर्मन-प्रकाशमान अन् निराशा पळून जाते
सूक्ष्म-ब्रह्मान्डी अंतर्बाह्य समतोल शक्य होते
माणसाला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सोडविते

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!