कविता : 🌷 ” ईश्वराची-सत्ता “


कविता : 🌷 " ईश्वराची-सत्ता "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

दीस येतात, दीस जातात...
यंत्रवतच, वर्षे पालटतात...
चिमणी पाखरंही, सर्रास
घरटी सोडून पसार होतात...

सारी दुखणी-खुपणी काढून...
काऊ-चिऊचा घास भरवून...
निगुतीने तळहाती वाढवले...
जीवाच्या आकांताने जपले...

हळूहळू बाळ-कृष्ण वाढले...
आई-बाबांहून उंचनिंच झाले...
शिकून-सवरुन कमवू लागले...
पूर्ण घरदार आनंदातच न्हाले...

अति-उच्च शिक्षणासाठी,
जड-अंत:करणाने रवानगी...
मनावर दगड ठेवून परदेशी...
खेचून आणी पदवी-यशश्री...

मातृ-चरणी, अर्पण केली...
धन्य धन्य ती माय झाली...
सगळं काही भरून पावली...
आनंदाश्रूंनी-आरती-ओवाळी...

धन्य धन्य ते सुपुत्र-कर्तृत्व...
धन्य धन्य ते ईश्वरीय-तत्व...
सदा-सर्वदा तपासिले सत्व...
धन्य धन्य झालं ते मातृत्व...

शरिरालाच, वयाची मर्यादा...
मनाला कसलीच ना बाधा...
चिरंतन चिरतरुण त्या चित्ता...
त्यावरी, फक्त ईश्वराची-सत्ता...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!