कविता : 🌷 ” अधांतरी “


कविता : 🌷 " अधांतरी "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

जेव्हां-जेव्हां अर्थशून्य भासे मजला सारा,
आयुष्यात मुखवट्यांचा तोच तो पिसारा...

सगळे मुबलक असल्याने, कमतरता नाही...
तरी मनात पालीचं चुकचुकणं थांबत नाही

घुमणारे पारवे सारे अधांतरी लोंबकळणारे...
एखाद्या क्षणाचीही जणूकाही उसंत नसणारे...

रोजच्याच जीवघेण्या खेळात न दमता-भागता
येणा-या दिवसांमध्ये तरीही आनंद अनुभवला

आयुष्यातील दर दिवसाला समाधानी राहून,
जीवनाचा ऊबदार शेला हा मन:पूर्वक विणून

ऊन-पाऊस-सैराट-वारं हसून अंगावर झेलून,
अधांतरी लटकतच डोंबा-यासम झोकून देऊन

आयुष्यातील सारीपाटावरील सोंगट्या आपण
खेळणा-याचे अदृश्य हात, अगतिक सारे जण

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!