कविता :🌷”शल्य”


कविता : 🌷 " शल्य "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

सगळं अगदी यथास्थित असूनही...
मनात सतत टोचत असतं काहीतरी...

कुणी म्हणतात," सुख बोचत असावं"
तर कुणा शंका, काय डाचत असावं ?

या जगती व्यक्ती तितक्या भिन्न प्रकृती
त्याहीपेक्षा कैक पटीने अधिक प्रवृत्ती

मखमली गालीच्यावर पाऊल टाकता,
अचानक एखाद-दुसरा काटा रुतावा

फार जीवघेण्या वेदनेने सलत राहावा
खूप प्रयत्नांती काढूनही, सल राहावा

काहींसा असाच अनुभव येत असता,
कर्तव्य भावनेने मतीवर पडदा पडावा...

आताशा सुख म्हणजे कसली बरं चंगळ...
कळेनासं होऊन, सगळा सावळा गोंधळ

राहून राहून एकच यक्ष-प्रश्न सतावणारा,
का म्हणून व्हावा, दुष्काळाचा भडीमारा...?

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!