
कविता : 🌷 " अनादि अनंत "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
आयुष्याच्या खेळामध्ये रममाण जरी झाली,
परिस्थितीच्या हातातील ती एक कठपुतळी...
खरं-खोटं हसून-खेळूनच जगते खेळी-मेळी,
मनस्विनी घरंदाज अशी निराळी जगावेगळी...
नात्यांच्या गुंत्यात जरी पुरती गुरफटून गेली
चूल-बोळकी संसाराची एक-हाती मांडलेली...
रोज सांज-सकाळी कातरवेळी जळी-स्थळी,
राखेतूनही बीज शोधीते, वसुंधरा वेडी-खुळी...
अनादि अनंत त्रिभुवनी तिजसम कुणी नाही...
आर्ततेने साद घालीत हिंडत फिरते भूमंडळी...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply