
कविता 🌷 " हात तुझा, हातात हवा "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
डोहातल्या चांदण्याला,
डोळ्यांनी स्पर्श करताना...
स्वप्नांतील चांदव्याला,
हळुच तळहाती धरताना...
सागर-तटी क्षितीजाला,
नजरेत कैद करताना...
बहरलेल्या प्राजक्ताला,
भल्या पहाटे पांघरताना...
पाना-पानांवर दवबिंदू,
खट्याळ हसत असताना...
गोड गुलाबी झुळूक,
गालांशी खेळताना...
पहिली-वहिली किरणे,
अंगांगावर झेलताना...
सावली-समान सदैव,
तुझाच हात, हातात हवा...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply