ब्रह्म-पुराणामधे स्त्रीच्या पाप-नाशनासाठीचा हा मंत्र आहे खास अनादि-अनंत कालापासूनच अन्याय-अत्याचार-शोषणादि त्रास, मुकाट्याने सोसून, मानसीक छळ, बदनामी व कष्ट-प्रद वनवास, गौण, दुय्यम-स्थानीय-वागवणूक आणि वर सक्तीचा एकांतवास…
प्रत्यक्षात अपराधी नसताना 'पापी-अपराधी-ठरवून' अवहेलना, आज मात्र त्यांच्या नावांचा मंत्र जपतात, करण्या पाप-नाशना देव जाणे, स्त्रीनं कशा सहन केल्या मानसीक-शारिरीक यातना आज विचार कर-करुनही, नाही येणार त्याची सुतराम कल्पना…
त्याकाळच्या पुरुष-प्रधान-संस्कृतीची हीच विपरीत विचार-सरणी, शाप-उ:शाप-अपमान-उपेक्षा-कलंकादि भडीमारानं केविलवाणी, आंतरिक सहन-शक्ती, कणखर वृत्ती व अविरत जिद्द लावून पणी, युगानु-युगांपासून चालत आलेली स्त्री-जन्मा-ही-तुझीच-कहाणी…
वास्तविकत: स्त्री-जन्म आणि स्त्रीरुप म्हणजेच मूर्तिमंत वात्सल्य, स्त्री म्हणजे शुद्ध शालीनता अन् आल्हाददायी-पवित्र असं मांगल्य स्त्री म्हणजेच परमोच्च कोटीचं मातृत्व, स्त्री म्हणजे अखंड कर्तृत्व स्त्री म्हणजे भक्कम असं नेतृत्व, स्त्री म्हणजेच सुसंस्कारांचं सत्व…
पृथ्वीतलावर संसार-रथाची दोन्ही चाकं जर नसतील एक-समान, समाजाचा-समतोल पार विस्कटून, परिस्थिती होईल दोलायमान बिघडून समाजाचं स्वास्थ्य, अत्यंत बिकट-स्थिती होईल निर्माण म्हणूनच स्त्री-पुरुष दोहोंचं अस्तित्व सुध्दा महत्वपूर्ण-सम-समान…
Leave a Reply