कविता:🌷”सुख वाकुल्या दाखवी”


कविता : 🌷 " सुख वाकुल्या दाखवी "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

जो जन्मा आला, त्याला काळ न सोडी
मनुष्याचे जीवन म्हणजेच काल-कोठडी...

उठल्यापासून झोपेपर्यंतची, धडपड वेडी
नात्यांच्या रेशिमगाठींची, हातीपायी बेडी...

आशा-निराशेचा खेळ, पिच्छा नच सोडी
आयुष्यातील गोळाबेरीज, घालते कोडी

नाका-तोंडात पाणी, जीव घाबरवून सोडी
बुडताना आधाराला मिळणार फक्त काडी

जाळ्यातील माशागत जीवाची होई कोंडी
पापपुण्याची खेचाखेच देई तोफेच्या तोंडी

जन्म-मरणाच्या रहाटगाडग्यात पिचते कुडी
मेटाकुटीला जीव तरी जगण्याची आस वेडी

एकेक दिवस रेटता-रेटता, फेस येईल तोंडी
फक्त स्वप्नामध्ये हाती लागते जादूची कांडी

मेजवानीस दहीभात, मनी आमरसाची गोडी
सुख वाकुल्या दाखवी, लांबवर मारुनी उडी...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!