कविता : 🌷 "सिध्दिंचे-उगमस्थान" कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि। सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी॥
आजचा हा नववा अवतार दुर्गा-देवीचा... दुर्गेच्या-सर्व स्वरूपांच्या शक्ति-गुणांचा, समावेश एकवटून जन्म झाला देवीचा... उच्चस्वरात जयघोष सिद्धिदात्री देवीचा...
सिंह-वाहीनी, प्रसन्न-वदना असे देवी... शुभ्र-वस्त्र प्रिय तिज, रूपाने तेजस्वी... अष्टौ-सिद्धिंचे उगम-स्थानच आहे ती... उपासनेने प्रसन्न होते सिद्धीदातीदेवी...
आरंभी आदि-पराशक्ति निराकार होती, रुद्रानेच मनोभावे आराधना केली तिची... अष्ट-सिद्धी प्रदान केल्या, देवीने रुद्रासी... तेव्हा शिवाच्या डाव्या-अंगी प्रकटली ती...
सिद्धिदात्री देवी, सर्व-सिद्धिंचे उगम-शरिर... प्रकटते डाविकडें शक्ति, उजवे शिव-शरीर... त्यामुळे देवाधिदेव झाले"अर्ध-नारी-नटेश्वर"… पृथ्वीवरी एका वेगळ्या अवतारातील ईश्वर...
सिद्धिदात्रीदेवी, असे कमळात विराजमान... डाव्या हातात कमळ, शंख शोभिवंत छान... हाती सुदर्शन, सर्व सिध्दिंचे ती उगम-स्थान... वनराजावर आरुढ अष्टौ-सिध्दिंचे करी दान...
Leave a Reply