
कविता : 🌷 " मंतरलेली संध्या "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
बहुधा ती वेळच होती वेडी,
तरीही होती, लोभसवाणी...
ऊन ही वाटे मखमली…
परि चांदणे पोळून जाई…
जीवनात बारा-मासही…
दिस जणू सुगीचे सुखदायी…
नेत्रांचे डोह जणू भरलेले…
तळाशी प्रीत-भाव दडलेले...
खोल खोल तळाशी गोड,
गूढ डोही, अनामिक ओढ…
नकळत गाली लालीमा…
जणू नभात विलसे चंद्रमा...
क्षण-क्षण सुगंधित झाले,
मन खुळे असे मोहरले…
ती मंतरलेली संध्याही,
मनी हुरहूर लावूनी गेली…
ओंजळभरल्या सुखामध्ये
नखशिखांत चिंब भिजली...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply