कविता:🌷”भुल-भुलैया”


कविता : 🌷 " भुल-भुलैया "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

संपूर्ण जगत् म्हणजेच भुल-भुलैया
षड्रिपूंनी हैराण सगळे तरीही रमैया ...

कोण असे राधा अन् कोण कन्हैया ...
कोण देवकी, आणि यशोदा मैय्या ...
.
जो जन्मास आला, तो पुरता रमला
सुखात-दु:खातही, हसतच राहीला ...

नियतीच्या झुल्यात, झुलत बसला
डोंबा-याचा खेळ, खेळतच राहिला ...

परिस्थिती नाचवीतसे, ता-ता-थैया …
जो तो रंजला-गांजला-जन्मही वाया …

तरी कणा-कणात आहे सुंदरसे स्वप्न
अन् मना-मनात नांदे सदा राधा-कृष्ण ...

जपूया राधा-कृष्ण, श्री गोपाल-कृष्ण...
जगूया श्री राधा-कृष्ण, गोपाल-कृष्ण...

कैक युगानु-युगांपासून, चाले हा खेळ ...
प्रत्येक स्त्री-पुरुष जणू राधा-कृष्ण-मेळ ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!