कविता:🌷”पितृऋण-फेडण्याची-सुवर्णसंधी”


कविता : 🌷 "पितृऋण-फेडण्याची-सुवर्णसंधी"
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

भारतीय संस्कृतीत मंगल-कार्य असो, सणवार असो
पूर्वजांच्या नावाचा-वंशाचा-गोत्राचा, उल्लेख असतो

ज्यांनी कुटुंबियांसाठी आयुष्यभर काबाड-कष्ट केले
त्यांच्या भरण-पोषणासाठी दिवस-रात्रही ना पाहिले

अशा आपल्या पितरांसाठी पंधरा दिवसांचे आयोजन
या पंधरवड्यात पितरांचे पूजन-तर्पण-व-पुण्य-स्मरण

भाद्रपदातील संपूर्ण वद्य पक्ष हा पूर्वजांसाठी समर्पित
पितृ-पक्ष, श्राद्ध-पक्ष, पितृ पंधरवडा म्हणूनी आरक्षित

श्रध्दा जिथे असते, तिथेच पितरांचे श्राध्द होऊ शकते
"श्राध्द" म्हणजे दिवंगत व्यक्तीचे, पुण्य-स्मरण असते

ज्या तिथीस पितरांचा मृत्यू, त्याच तिथीला श्राद्ध होते
म्हणून पितृ पक्षातील सर्व तिथींना खास महत्त्व असते

शतकानुशतके जपलेली-जोपासली गेली आहे ही प्रथा
मंत्रोच्चारे अन्नदान व पिंडदानाने लाभेल पितरांची-कृपा

पितरांच्या संतुष्टीसाठीच विधिवत श्राद्धविधी नियोजित
पितृस्मरणा-प्रीत्यर्थ ब्राह्मणास-अन्न-दान-धर्म आयोजित

अप्रत्यक्षपणे पूर्वज कुटुंबियांचे रक्षणच करीत असतात
त्यांच्या स्वतःसाठी, तेही, विधीवत पिंडदान अपेक्षितात

प्रसन्न होऊन आपल्यालाही मूकपणे आशिर्वादच देतात
दुर्लक्षित, दु:खी पितरांच्या शापास-"पितृदोष" म्हणतात

ज्यांनी जिवंतपणी खूप काही केलं, ते ऋण फेडण्याची
पितृ-पंधरवडा ही सर्वांसाठीच आहे, एकमेव सुवर्णसंधी

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!