कविता : 🌷 " छुप्या नरकासुरांचा वध " कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
आज कृष्ण-सत्यभामा द्वयीने, मध्यरात्रीला... क्रूर -दुराचारी अशा नरकासुराचा वध केला... मुक्त केले, छळवणूकीने ग्रासलेल्या प्रजेला... सूर्योदय-होण्याच्या आधीच क्रूरात्मा-वधला...
भुदेवीच्या रूपे सत्यभामा कृष्णास साथीला अशारितीने शूरवीर-द्वयीने मारून राक्षसाला, बंदिवासातील सोळा सहस्र बंदिवान-अबला बंदिगृहातून-घोर अत्याचारांतून, मुक्त केल्या
असुर-वध-स्मृती म्हणून अभ्यंग-स्नानाची प्रथा... सचैल स्नान, धूत-वा कोरी-वस्त्रं, फराळ-नाश्ता... अशी सुरु झाली,उत्सव साजरा करण्याची प्रथा... आजतागायत जन-मानसात रुजली आहे कथा...
आजही गरज आहे, श्रीकृष्ण-सत्यभामा बनून... समाजातील छुप्या, अत्याचारी-दैत्यांना हूडकून... अत्यंत-जरुरीचं-आहे छुप्या-नरकासुरांस-मारणं... आवश्यक आहे, त्यांचा समूळच निप्पात करणं...
नरकासुर जसे बाह्य-जगातले, तसेच मनातलेही.. त्या सर्वांना हुडकून काढून नष्ट करणे, जमेलही... कारण "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता गळे तेलही" जर मनावर घेऊ, तर लीलया उचलू मेरु-पर्वतही...
Leave a Reply