कविता : 🌷 " इहलोकी स्वर्ग " कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले असेना का वास्तव्य आपले तुटपुंजे दीड, पाच, दहा दिवसांचे-वा-तपांचे... प्रत्त्येक क्षण-न्-क्षण, पर्व आनंदाचे सुख देणे-सुख घेणे, आहे महत्त्वाचे... जितका समय आहे लाभला, ज्याच्या-त्याच्या आयुष्यातला... रात्रीचा दिवस करूनी आता, उधाणच येऊ दे कृतज्ञतेला... चराचराला चैतन्यमयी करणारा, अंश-रूपे जीव-जीवात वसणारा... तो कृपाळू, सर्वांसी तारून नेणारा, समर्थ आहे काळजी वहावयाला... ज्याक्षणी अहम् आणि त्वम् मिसळून एकरूप, एकसंध, एकजीवच होऊन... जीव-शिव स्वरूपातील द्वैत ओळखेल, आप-पर-भाव संपूर्णपणेच विरघळेल... आपण सारे औट घटकेचे प्रवासी... हे भान ठेवूनच, कला जगण्याची... ज्याला-ज्याला हा मतितार्थ उमगला, त्यांनी इहलोकीच, स्वर्ग अनुभवला... त्यांनी इहलोकीच, स्वर्ग अनुभवला... 🌷@तिलोत्तमा विजय लेले 🙏🕉️🔆
Leave a Reply