कविता : 🌷 " आराधना चंद्रघंटेची " कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
शिव-पार्वती शुभ-विवाह सोहळा संपन्न होता ... गौरीने भाळी धारण केली, अर्धचंद्राकृती घंटा ... त्याघंटेमुळे तदनंतर देवीचे नाव पडले चंद्रघंटा ... तिसऱ्या दिवशीची शुभ-माळ, चंद्रघंटे करीता ...
शस्त्रं-अस्रांनी सुसज्ज, दश-भुजा त्रिनेत्रा देवी ... त्रिशूल, गदा, धनुष्य, खड्ग, एकेका करी ठेवी ... कमल-पुष्प तथा कमंडलू धरिले एकेका हाती ... एक हात उंच वर-देण्या, तलवार उजव्या हाती ...
दानवांचा निःपात करण्यास, देवी तयार ... कौशिकीच्या स्वरुपात दुर्गा झाली स्वार ... व्याघ्रारूढ देवी, फेके डोळ्यातूनी अंगार ... शुंभ-व-निशुंभाचा विनाश केला अपरंपार ...
कोपलेल्या चंद्रघंटेचे वाहन, व्याघ्र ... रणचंडिकेचे भीषण रूप घेतले उग्र ... रणी खच दानवांचा, देवी राही अग्र ... धुम्रलोचन-वध, पराभूत दैत्य समग्र ...
चंद्रघंटा देवीचे करता पूजन-अर्चन ... शुभ-आशिर्वादे पापांचे होई क्षालन ... सर्व बाधा नष्ट, कार्य होती निर्विघ्न ... होते कष्टांचे निवारण, भक्तांचे-रक्षण ...
वांच्छित लाभासाठी, देवीची आराधना ... होईल प्रगती कृपेने-अध्यात्मिक-साधना ... यथाशक्ती अर्पण करूनी, तन-मन-धना ... माता चंद्रघंटा हरण करी साऱ्या विवंचना ...
Leave a Reply